Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • MPSC गट-क परीक्षा: शुल्क न भरता अर्ज अपडेट करण्याची संधी
Nashik

MPSC गट-क परीक्षा: शुल्क न भरता अर्ज अपडेट करण्याची संधी

नाशिक | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ संदर्भातील एक महत्त्वाचे शुद्धीपत्रक आयोगाने जाहीर केले आहे. या परीक्षेच्या जाहिरातीनुसार काही पदांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक अर्हतेबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून, संबंधित उमेदवारांना त्यांच्या प्रोफाइलमधील शैक्षणिक अर्हता सुधारित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयोगाने १३ नोव्हेंबर रोजी हे शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे.

शैक्षणिक अर्हता सुधारणा प्रक्रिया

आयोगाने २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २६ हजार ७३७ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसंदर्भात ६ नोव्हेंबर २०२६ रोजी पूर्वी शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते, ज्यामध्ये काही पदांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक स्पष्टता देण्यात आली होती. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपल्या प्रोफाइलमधील शैक्षणिक अर्हता तपासून आवश्यक सुधारणा करणे गरजेचे आहे.

या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील ‘प्रोफाइल क्रिएशन’ विभागातील शैक्षणिक अर्हता सुधारित करून ‘प्रोफाइल लॉक’ करणे आवश्यक आहे. त्यानंतर ‘माय अकाउंट’ मधील पर्यायावर जाऊन ‘कॉलिफिकेशन अपडेट’ करावे लागेल. पुढे ‘रिचेक एलिजिबिलिटी’ या पर्यायावर क्लिक करून पात्रता तपासावी आणि संबंधित संवर्गासाठी अर्ज करावयाच्या असल्यास ‘अपप्लाय व सबमिट’ पर्यायाचा वापर करावा.

शुद्धीपत्रकामुळे उमेदवारांना मोठा दिलासा

या संपूर्ण प्रक्रियेसाठी उमेदवारांना पुन्हा कोणतेही परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. तसेच, यापूर्वी केलेले अर्ज रद्द करण्याचीही आवश्यकता नाही. परीक्षेच्या मूळ जाहिरातीमधील अन्य अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी शुद्धीपत्रकातील सूचनांचे पालन करून आपली शैक्षणिक माहिती लवकरात लवकर अद्ययावत करावी, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts