Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • नाशिकमध्ये ओझरखेड धरणाजवळ साकारणार भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक
Maharashtra

नाशिकमध्ये ओझरखेड धरणाजवळ साकारणार भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक

भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रस्तावित स्मारकाची व ओझरखेड धरण परिसराची चित्रफीत

नाशिक | क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने आदिवासी आयुक्तालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत विविध घोषणा करण्यात आल्या. या पत्रकार परिषदेस जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, डॉ. कश्मिरा संख्ये, महानगरपालिका स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि लक्ष्मण सावजी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्य लढा आणि जल, जंगल, जमिनीच्या हक्कासाठी दिलेल्या संघर्षाचे स्मरण केले.

ओझरखेड धरणाजवळ चार कोटींच्या निधीतून स्मारक

दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळ पाच एकर क्षेत्रात भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक साकारण्यात येणार आहे. या धरण परिसरातील पर्यटन सुविधांचा विकास आणि २१ फूट उंच पुतळ्याची उभारणी करण्यासाठी चार कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत परिसरात वृक्षारोपण देखील केले जाणार आहे. यामुळे ओझरखेड धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होण्यास मदत होणार असून स्थानिक पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. जिल्हा विकास आराखड्यांतर्गत उपलब्ध झालेल्या प्रोत्साहनात्मक निधीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला प्रोत्साहन दिले जात आहे. या स्मारकाच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचा व आदिवासी समाजाच्या संघर्षाचा गौरव केला जाईल.

जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दुर्गम पाड्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात विशेष सेवा सप्ताह राबविला जात आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ, आवश्यक कागदपत्रे, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणा थेट आदिवासी बांधवांच्या दारापर्यंत पोहोचून रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधांसह घरकुल, शिक्षण, आरोग्य आणि शेतीशी संबंधित योजनांची माहिती पोहोचवत आहे. या सप्ताहात न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वितरण, स्मारकांची स्वच्छता, दीपोत्सव, आधार कार्ड व कागदपत्रे सेवा शिबिरे, आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरे आयोजित केली जात आहेत. या पत्रकार परिषदेत आयुक्त लीना बनसोड यांनी शबरी नॅचरल ब्रँडच्या डिझाईनला मिळालेल्या पुरस्काराची माहिती दिली, तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उधमाळ येथे विकसित होणाऱ्या ॲस्ट्रो टुरिझम धोरanaची माहिती दिली.

Source: Cosmo News Desk

Related Posts