Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • मुंबईत ‘बाल अधिकार सप्ताह २०२६’ चा प्रारंभ
Maharashtra

मुंबईत ‘बाल अधिकार सप्ताह २०२६’ चा प्रारंभ

मुंबईतील रेल्वे स्थानकावर बालदिन साजरा करताना मुले आणि अधिकारी

मुंबई | संयुक्त राष्ट्रसंघाने २० नोव्हेंबर १९८९ रोजी बालहक्क संहिता स्वीकारली असून या निर्णयाला यंदा ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर बालकांच्या हक्कांसंबंधी आणि सुरक्षिततेबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संपूर्ण राज्यात १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘बाल अधिकार सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा मुंबई शहर जिल्ह्यात नुकताच शुभारंभ करण्यात आला.

प्रमुख रेल्वे स्थानकांवर बालदिन साजरीकरण

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती शोभा शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई शहर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्प लाईन यांच्या संयुक्त विद्यमाने १४ नोव्हेंबर २०२६ रोजी बालदिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि मुंबई सेंट्रल या प्रमुख रेल्वे स्थानकांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रेल्वे स्थानक परिसरात आणि प्रवासादरम्यान आढळलेल्या बालकांना गुलाबाचे फूल व चॉकलेट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बालकांच्या हस्ते केक कापून बालदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित बालक, पालक व प्रवाशांना बाल संरक्षणासाठी कार्यरत शासकीय यंत्रणांची माहिती देण्यात आली. कोणत्याही संकटात किंवा असुरक्षित स्थितीत असलेल्या बालकांच्या मदतीसाठी २४ तास कार्यरत असणारा चाइल्ड हेल्प लाईन क्रमांक १०९८ आणि आपत्कालीन पोलीस मदत क्रमांक ११२ बाबत जनजागृती करण्यात आली.

विविध उपक्रम आणि जनसहभाग

हा सप्ताह १४ ते २० नोव्हेंबर २०२६ दरम्यान चालणार असून यादरम्यान मुंबई शहर जिल्ह्यातील रेल्वे स्थानके, पोलीस ठाणी, शाळा, रुग्णालये आणि वस्तीस्तरावर स्वाक्षरी मोहीम, जनजागृती रॅली, सेल्फी फ्रेम, पथनाट्य, फ्लॅशमॉब व माहिती पत्रके वाटप यांसारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमात महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, रेल्वेचे स्टेशन मॅनेजर, लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आणि ‘रेल्वे चिल्ड्रन्स इंडिया’, ‘मुंबई स्माईल्स’, ‘हमारा फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहितीसाठी चाइल्ड हेल्प लाईन मुंबई शहरचे प्रकल्प समन्वयक नितीन अशोक दिक्षित यांच्याशी ९८६७१७५८७२ या क्रमांकावर किंवा chlmumbaicity@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts