Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिक जिल्हा परिषदेत ठेकेदारांच्या वावरावर कडक निर्बंध
Nashik

नाशिक जिल्हा परिषदेत ठेकेदारांच्या वावरावर कडक निर्बंध

नाशिक जिल्हा परिषदेत प्रशासकीय शिस्त मोडणाऱ्या आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना डावलून थेट फायली हातात घेऊन फिरणाऱ्या ठेकेदारांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रतिभा संगमनेरे यांनी सज्जड दम दिला आहे. कर्मचाऱ्यांशिवाय इतर कोणाच्याही हातात कार्यालयीन फाइल आढळल्यास, संबंधित कर्मचाऱ्याला थेट निलंबित केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ठेकेदारांच्या हस्तक्षेपावर कडक कारवाई

जिल्हा परिषदेची नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतरही प्रशासकीय नियमांकडे दुर्लक्ष करून ठेकेदार स्वतः फायली घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनात स्वाक्षरीसाठी जात असल्याचे समोर आले आहे. एका ठेकेदाराने संपूर्ण फाइल आणण्याऐवजी केवळ ठराविक कागद हातात घेऊन डॉ. संगमनेरे यांच्यासमोर स्वाक्षरीसाठी काढला होता. कोणतीही कागदपत्रे नसताना आणि अर्धवट माहितीच्या आधारे सुट्ट्या कागदांवर स्वाक्षरी कशी करायची असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी त्या ठेकेदाराला दालनाबाहेर पाठवले. हा प्रकार घडल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत दुसरा ठेकेदारही अशाच प्रकारे फाइल घेऊन दाखल झाला. या घटनांमुळे संतप्त झालेल्या डॉ. संगमनेरे यांनी बांधकाम विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करत त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश दिले. भविष्यात अशा प्रकारे ठेकेदारांमार्फत फाइल समोर आल्यास संबंधित कर्मचाऱ्याचे तत्काळ निलंबन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

स्वतंत्र ‘निविदा सेल’ स्थापनेचा प्रस्ताव

बांधकाम विभागातील अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी आणि फायलींचा अनावश्यक प्रवास रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. जिल्हा परिषदेच्या तिन्ही बांधकाम विभागांची निविदा प्रक्रिया एकाच छताखाली राबवण्यासाठी स्वतंत्र ‘निविदा सेल’ निर्माण करण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. हा सेल कार्यान्वित झाल्यानंतर सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी पार पडेल, ज्यामुळे फायली हाताळणीत पारदर्शकता येईल आणि प्रशासकीय कामात होणारा ठेकेदारांचा हस्तक्षेप पूर्णपणे थांबण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts