Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडीसाठी महसूल विभागातर्फे त्रिस्तरीय कार्यपद्धती निश्चित
Maharashtra

ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडीसाठी महसूल विभागातर्फे त्रिस्तरीय कार्यपद्धती निश्चित

शेतकरी ओळख क्रमांक व फार्मर आयडी नोंदणीची कागदपत्रे तपासणारा महसूल अधिकारी

मुंबई | ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत जमीनधारणा किंवा प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्राची माहिती उपलब्ध नसलेल्या अपवादात्मक प्रकरणांतील पात्र शेतकरी, जमीनधारक आणि प्रत्यक्ष शेती करणाऱ्या व्यक्तींना शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) मिळवून देण्यासाठी महसूल विभागाने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित केली आहे. १ जानेवारी २०१५ पूर्वीपासून शेती कसत असलेले व पुरावा असणारे शेतकरी, अधिकृत भाडेपट्टा किंवा कराराने शेती करणारे आणि शासनाकडून जमीन मंजूर अथवा वाटप झालेल्या पात्र व्यक्तींना या प्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे.

त्रिस्तरीय पडताळणी आणि मान्यता प्रक्रिया

अपवादात्मक प्रकरणांमध्ये फार्मर आयडी देण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार या तीन स्तरांवर पडताळणी प्रक्रिया ठरवण्यात आली आहे. ग्राम महसूल अधिकारी जुने व अद्ययावत महसुली अभिलेख, महसूल भरल्याच्या पावत्या, भाडेपट्टा किंवा करारपत्र, जमीन मंजुरी आदेश यांसारख्या कागदपत्रांची तपासणी करून क्षेत्र निश्चित करतील आणि कागदपत्रांच्या प्रती प्रणालीवर अपलोड करून शेतकऱ्यांची यादी चावडीवर प्रसिद्ध करतील. यानंतर मंडळ अधिकारी या माहितीची पडताळणी करून प्रकरण मान्यतेसाठी तहसीलदारांकडे पाठवतील. त्रुटी आढळल्यास प्रकरण पुन्हा ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे सुधारण्यासाठी पाठवले जाईल. तहसीलदार अभिलेख व पडताळणी तपासून प्रकरणास मंजुरी किंवा नामंजुरी देतील.

स्वतंत्र फार्मर आयडी प्रदान करणे व अन्य तरतुदी

तहसीलदारांच्या मान्यतेनंतर प्रणालीमध्ये नोंदविलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतजमिनीला स्वतंत्र फार्मर आयडी दिला जाईल आणि ही माहिती केंद्रीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेकडे पाठवली जाईल. त्यानंतर नागरिकांना सुविधा केंद्रामार्फत नोंदणी करता येईल. महसूल विभागाने स्पष्ट केले आहे की, या प्रक्रियेमुळे महसुली अभिलेखांतील नोंदी, मालकी हक्क किंवा वैधानिक हक्कांमध्ये कोणताही बदल होणार नाही. यासाठी स्वतंत्र प्रणाली किंवा मॉड्यूल विकसित करण्याची जबाबदारी जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts