Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • दुष्काळावर मात करण्यासाठी शासन कटिबद्ध: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
Maharashtra

दुष्काळावर मात करण्यासाठी शासन कटिबद्ध: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव घारोड गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना

बुलढाणा | अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी खामगाव तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ घारोड गावात प्रत्यक्ष भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. साऊएकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने आयोजित भाऊबीज कार्यक्रमानिमित्त १० नोव्हेंबर रोजी रात्री त्यांनी या गावाला भेट दिली आणि शेतकरांच्या अडचणी जाणून घेतल्या. या गावातील एकल निराधार महिला देवकाबाई अढाव आणि दुर्गा अनंता कड यांच्या घरी भेट देऊन त्यांनी भाऊबीज साजरी केली.

शेतकरी व महिलांसाठी शासनाच्या विविध योजना

यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत असून, दुष्काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आणि राज्य शासनाने त्यात अतिरिक्त मदत जोडली आहे. दिवाळी अग्रीम म्हणून पाच हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. दुष्काळाच्या संकटात दिलासा देण्यासाठी शासन विविध स्तरांवर उपाययोजना करत असून कर्जमाफी, नदीजोड प्रकल्प आणि जलसंधारणाच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला जात आहे. पाण्याची उपलब्धता वाढवून शेतीला सिंचनाची सुविधा मिळावी आणि भविष्यातील दुष्काळाचा प्रभाव कमी व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पाणीपुरवठा योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता

दौऱ्यादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी देवकाबाई अढाव यांच्या घरी भाऊबीजेची ओवाळणी स्वीकारली आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांनी शेतकऱ्यांसोबत बसून शेतीतील अडचणी, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, कर्जाचा बोजा आणि शासनाकडून मिळालेल्या मदतीबाबत सविस्तर चर्चा केली. घारोड हे अतिदुर्गम डोंगराळ भाग असल्याने तेथील शेतकऱ्यांना दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. या दौऱ्यात घारोड गावातील पाणीपुरवठा योजनेच्या अपूर्ण कामासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण असलेल्या या पाणीपुरवठा योजनेस राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून, याचे मंजुरी पत्र केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच वैभव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी सरपंच वैभव ठाकरे, ॲड. अमोल अंधारे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts