Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पालांवरच शाळा सुरू होणार
Maharashtra

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पालांवरच शाळा सुरू होणार

पालकमंत्री जयकुमार गोरे ऊसतोड कामगारांच्या पालावर दिवाळी साजरी करताना

सोलापूर | ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कामगारांच्या पालांवर आणि त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणीच शाळा सुरू करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन पालकमंत्र्यांनी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली.

पालकांवर जाऊन साधला संवाद

पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कामगारांसोबत दिवाळीचा फराळ घेतला. यावेळी त्यांनी कामगारांना फराळ व आहेर भेट दिली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने महिलांना भाऊबीजेची भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणाची माहिती घेतली. मराठवाडा, विदर्भ व नंदुरबार येथून हे सर्व ऊसतोड कामगार आले आहेत.

शिक्षणातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न

ऊसतोड कामगारांची मुले प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असून, त्यांची शाळा मूळ गावी असल्यामुळे स्थलांतराच्या काळात त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात. ही अडचण लक्षात घेऊन शासनाने मुलांना त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणीच शिक्ष of सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा करून स्थानिक पातळीवर शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याबाबत पुढाकार घेण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले असून आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, तहसीलदार सचिन लंगोटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts