Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • पंढरपूर कॉरिडॉर: सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर
Maharashtra

पंढरपूर कॉरिडॉर: सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर

पंढरपूरमध्ये सफाई कामगारांसोबत दिवाळी फराळ करताना पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर | पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत शहरातील २१३ सफाई कामगारांना प्रत्येकी ६०० चौरस फुटांचे हक्काचे घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक सफाई कामगाराला स्वतःचे हक्केचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. दिवाळीनिमित्त आयोजित सफाई कामगारांसोबत फराळाचा कार्यक्रम आणि सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

निधी आणि अतिरिक्त प्रस्तावावर चर्चा

या कार्यक्रमास आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, माजी आमदार प्रशांत परिचारक, कामगार नेते गुरु देवडी, दिग्विजय बागल, समाधान देशमुख, दिलीप धोत्रे, नगरसेवक अनिल सावंत, नगरसेवक नागेश भोसले, तहसीलदार सचिन लंगोटे आणि मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने सफाई कामगार उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी अतिरिक्त १५० सफाई कामगारांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून कामगारांना दिवाळीची भेट देण्याचे निर्देश दिले. या प्रस्तावातील अडचणी सोडवून कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यास शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आषाढी वारी आणि सफाई कामगारांचे योगदान

पंढरपूरची आषाढी वारी स्वच्छ आणि सुंदर वारी म्हणून महाराष्ट्र, देश आणि जागतिक स्तरावर ओळख निर्माण करत आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून आषाढी वारीच्या स्वच्छतेचे सर्वत्र कौतुक होत असून, या यशात सफाई कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. वारीदरम्यान उत्कृष्ट स्वच्छतेचे काम केल्यामुळे पंढरपूर स्वच्छ राहण्यास मदत झाली असून या यशाचे खरे शिलेदार सफाई कामगार आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने महिला सफाई कामगारांना भाऊबीजेची भेट देण्यात आली आणि पुरुष कामगारांना दिवाळी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

Source: Cosmo News Desk

Related Posts