Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत वनमंत्री गणेश नाईक यांची ठाण्यात भेट
Maharashtra

शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत वनमंत्री गणेश नाईक यांची ठाण्यात भेट

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात शेतकरी व आदिवासी बांधवांसोबत संवाद साधताना वनमंत्री गणेश नाईक

ठाणे | यंदाच्या दिवाळी सणात लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील करपटवाडी (ढाढरे) येथे प्रत्यक्ष भेट दिली. निसर्गाच्या लहरीपणापुढे आणि दुष्काळी छायेखाली हतबल झालेल्या शेतकरी व आदिवासी बांधवांसोबत त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्रिमंडळाला केलेल्या आवाहनानुसार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करण्याचे ठरवले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत वनमंत्री गणेश नाईक यांनी ही भेट दिली असून, संकट कितीही मोठे असले तरी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हा विश्वास या दौऱ्यामुळे दृढ झाला आहे.

शेतकऱ्यांच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

या दौرىदरम्यान आयोजित संवाद सभेत बोलताना माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. शंभर टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच शेतकरी बांधवांच्या सर्व मागण्या आणि समस्या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवून त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शासनाची प्रभावी अंमलबजावणी आणि दिलासादायक भूमिका

दुष्काळी पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी विविध उपायोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये पीक नुकसानीची भरपाई, वेळेत उपलब्ध होणारे थेट अनुदान, आपत्कालीन निधी आणि विविध कृषिपूरक उपायोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाची ही कर्तव्यपरायणता आणि तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचण्याची तयारी यामुळे दिसून येत आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, शासन बळीराजाच्या पाठीशी सदैव कटिबद्ध असल्याचा संदेश मिळाला आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts