Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • सटाण्यात तोतया अन्न व औषध अधिकारी पोलिसांच्या ताब्यात
Nashik

सटाण्यात तोतया अन्न व औषध अधिकारी पोलिसांच्या ताब्यात

नाशिक | दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी वाढली असताना, याचा गैरफायदा घेत अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी असल्याचे भासवून एका मिठाई विक्रेत्याला दमदाटी केल्याची घटना सटाणा शहरात घडली. शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या राजस स्वीट्स या दुकानात हा प्रकार समोर आला. दुकानदाराच्या सतर्कतेमुळे या तिन्ही तोतया अधिकाऱ्यांचा बोगसपणा उघडकीस आला आहे.

मिठाई दुकानात बनावट अधिकाऱ्यांचा प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तिघा जणांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगत थेट दुकानात प्रवेश केला. दुकानमालक रोहित सोनवणे यांच्याकडे त्यांनी विविध परवानग्या मागितल्या. तसेच दुकानातील अस्वच्छतेचा मुद्दा पुढे करत सोनवणे यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आणि देहबोलीवरून दुकानमालक रोहित सोनवणे यांना त्यांच्यावर संशय आला.

सतर्कतेमुळे तोतया पकडले

सोनवणे यांनी तिघांकडे त्यांच्या ओळखपत्रांची मागणी केली, ओळखपत्र मागताच त्यांची भंबेरी उडाली. त्यानंतर त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपस्थित ग्राहकांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना रोखून धरले आणि तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांनी विश्वास शिवाजी उपाडे (रा. अंबड), भगवान कचरू आहिरे (रा. सावरकरनगर, नाशिक) आणि स्वप्निल उमेश बागूल (रा. पाथर्डी फाटा, नाशिक) या तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts