Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे: मकरंद जाधव पाटील
Maharashtra

दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे: मकरंद जाधव पाटील

बुलढाणा येथील दुष्काळ आढावा बैठक

बुलढाणा | जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले आहेत. संभाव्य दुष्काळ आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे, आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शेतकरी कर्जमाफी आणि आर्थिक मदत

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. कोणताही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट अधिक गडद होऊ नये, म्हणून दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. महसूल आणि कृषी विभागाने समन्वयातून काम करून शेतकऱ्यांना शासनाच्या सवलती मिळवून द्याव्यात. शासनाने ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

चारा, पाणी आणि जलसंधारणाचे नियोजन

संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी पशुसंवर्धन आणि कृषी विभागाने आतापासून नियोजन करावे. शेतकऱ्यांना चारा लागवड व उत्पादनासाठी प्रोत्साहित करावे आणि वनक्षेत्रात वणवे लागू नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नद्यांचे खोलीकरण, तलावांमधील गाळ काढणे, नाले खोलीकरण, शेततळ्यांची निर्मिती आणि माथा ते पायथा जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. या कामांचे सूक्ष्म नियोजन करून ‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून गती द्यावी. तसेच दिवाळी सणात वीजपुरवठा सुरळीत राहील याची खात्री करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Source: Cosmo News Desk

Related Posts