Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात नगरसेवकांची अवहेलना, महापौरांनाही ठेवले दूर
Nashik

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात नगरसेवकांची अवहेलना, महापौरांनाही ठेवले दूर

नाशिक | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात जनप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याच्या आरोपानंतर आता ध्वजारोहण सोहळ्यात महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांची अवहेलना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरी आहेर आडके यांना ध्वजस्तंभापासून दूर स्थान देण्यात आले. तसेच १२० नगरसेवकांसाठी करण्यात आलेली आसनव्यवस्था अडगळीच्या ठिकाणी असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून याचे पडसाद मनपाच्या महासभेत उमटणार आहेत.

आसनव्यवस्था आणि पोलिसांशी वाद

शनिवारी (दि. ३१) सिंहस्थ कुंभपर्वाचा ध्वजारोहनाने प्रारंभ झाला. सोहळ्यासाठी दीड हजार व्हीआयपींसह मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते. मनपाच्या १२० नगरसेवकांसाठी रामकुंड आणि गांधी तलावादरम्यान आसनव्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या जागेसमोर मंदिर असल्याने ध्वजारोहण सोहळा स्पष्टपणे दिसत नव्हता. त्यातच नगरसेवकांसाठी राखीव जागांवर काही साधू बसल्याने अनेकांना बसण्यासाठी जागा उपलब्ध झाली नाही. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी मध्यस्थी करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी रोष कायम राहिला. ज्येष्ठ नगरसेवक गुरुमीत बग्गा यांनी रामकुंडामोरील व्हीआयपी कक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी रोखले, ज्यावरून वाद झाला आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर प्रवेश मिळाला. उपमहापौर विलास शिंदे यांचाही सुरक्षा यंत्रणांशी वाद झाल्याचे समोर आले.

महापौरांना दूर ठेवल्याने आश्चर्य आणि महासभेत पडसाद

महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी सोहळ्यात उपस्थित राहून मंत्री आणि व्हीआयपींचे स्वागत केले, परंतु प्रत्यक्ष ध्वजारोहणावेळी राष्ट्रपतींसोबत ध्वजस्तंभाजवळ उभे राहण्याची संधी त्यांना मिळाली नाही. राष्ट्रपती, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना अग्रस्थान देण्यात आले तर महापौरोंना दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही नगरसेवकांना व्हीव्हीआयपी कक्षातील पहिल्या रांगेत स्थान मिळाल्याने दुजाभावाचा आरोप करण्यात आला. सिंहस्थ सोहळ्यात जनप्रतिनिधींना सन्मानजनक वागणूक मिळाली नसल्याची भावना व्यक्त करत हा मुद्दा महासभेत उपस्थित करून प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरणाकडून खुलासा मागितला जाणार आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts