Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Kumbh Mela
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ ध्वजपूजन
Kumbh Mela

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ ध्वजपूजन

नाशिक | त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी (दि.३१) सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ध्वजपूजन सोहळा अत्यंत धार्मिक आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या महत्त्वपूर्ण सोहळ्यास विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर आणि आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या हस्ते धार्मिक विधी आणि गोदावरी पूजन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे आगमन झाल्यानंतर धार्मिक विधींना औपचारिक सुरुवात झाली. पुरोहितांच्या मंत्रोच्चाराच्या घोषात राष्ट्रपतींच्या हस्ते पवित्र गौतमी गंगा गोदावरीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर सिंहस्थ ध्वजाचे पूजन करण्यात आले. याशिवाय राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष अर्घ्य अर्पण करून गोदावरी आरती करण्यात आली. या वैदिक मंत्रघोषांमुळे संपूर्ण कुशावर्त तीर्थ परिसरात एक अत्यंत भक्तिमय वातावरण तयार झाले होते.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आणि सन्मान

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्यास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि रोहयो व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय कार्यक्रमात आमदार गोकुळ गीते, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, श्री हरिगिरीजी महाराज, विविध आखाड्यांचे साधू, महंत आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष प्रसंगी पुरोहित संघाच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सन्मानपूर्वक ताम्रपट प्रदान करण्यात आला.

Source: Cosmo News Desk

Related Posts