Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ३६.६२ लाख लाभार्थ्यांना धान्य वाटप
Nashik

नाशिकमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ३६.६२ लाख लाभार्थ्यांना धान्य वाटप

नाशिक | दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पात्र कुटुंबांना अन्नाचा लाभ मिळावा यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून धान्य वितरणावर भर देण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील ३६ लाख ६२ हजार ११७ लाभार्थ्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे धान्य वितरण करण्यात आले. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने गुरुवारी (दि. २२) दुष्काळी तालुक्यांतील गरजू लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरसाठी धान्य नियतन

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी गहू, तांदूळ आणि ज्वारीच्या ४ लाख २७ हजार ४०० क्विंटल धान्य नियतनस मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील शासकीय गोदामांची एकूण साठवणक्षमता ५ लाख ८ हजार ८८० क्विंटल आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरसाठी मंजूर ४ लाख २७ हजार ४०० क्विंटल धान्यापैकी २ लाख २६ हजार ८२० क्विंटल धान्याची उचल पूर्ण झाली असून उर्वरित धान्याची उचल करून रास्त भाव दुकानांमार्फत लाभार्थ्यांपर्यंत वितरण करण्याचे नियोजन आहे. सप्टेंबरमध्ये अंत्योदय अन्न योजनेतील ७ लाख २६ हजार ३०३, तर प्राधान्य कुटुंब योजनेतील २९ लाख ३५ हजार ७१४ लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळाला आहे.

नवीन शिधापत्रिका आणि पोर्टेबिलिटी सुविधा

दरम्यान, २५ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात ३ हजार ५२४ नवीन शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. यात अंत्योदय अन्न योजनेच्या २२५ आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या ३ हजार २९९ शिधापत्रिकांचा समावेश आहे. यामुळे अंत्योदय योजनेतील ८०२ आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील १२ हजार ८८ अशा एकूण १२ हजार ८९० लाभार्थ्यांना लाभ मिळणार असून जुन्या शिधापत्रिकांमध्ये ७ हजार २०७ नवीन सदस्यांची नोंद करण्यात आली आहे. दुष्काळामुळे स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी ‘पोर्टेबिलिटी’ सुविधेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. कोणतेही पात्र कुटुंब धान्याच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी केले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts