Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • आरोग्यमंत्र्यांनी १०८ रुग्णवाहिकेतून प्रवास करून घेतली सेवांची पाहणी
Maharashtra

आरोग्यमंत्र्यांनी १०८ रुग्णवाहिकेतून प्रवास करून घेतली सेवांची पाहणी

मंत्री प्रकाश आबिटकर १०८ रुग्णवाहिकेतून प्रवास करताना

छत्रपती संभाजीनगर | सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य संवाद यात्रेदरम्यान १०८ रुग्णवाहिकेतून प्रत्यक्षात प्रवास करून आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांची पाहणी केली. रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत मिळणाऱ्या सुविधा, रुग्णवाहिकेचा प्रतिसाद काळ आणि वैद्यकीय सेवेचा दर्जा प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आमदार प्रशांत बंब, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानेरे, सहाय्यक संचालक हिवताप डॉ. रेखा भंडारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर आणि आरोग्य विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रुग्णवाहिकेतील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी

मंत्री आबिटकर यांनी या प्रवासादरम्यान रुग्णवाहिकेमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन सुविधा, स्ट्रेचर, प्रथमोपचार संच, औषधसाठा तसेच प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवांची सविस्तर माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी स्वतः लासूर स्टेशन ते गंगापूर असा रुग्णवाहिकेतून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी रुग्णवाहिका चालक आणि आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी सेवा बजावताना येणाऱ्या अडचणी, रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात उद्भवणाऱ्या समस्या आणि आवश्यक असलेल्या सुविधांविषयी सखोल चर्चा केली.

शासन सेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील

या प्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक रुग्णासाठी रुग्णवाहिका ही एक धावती रुग्णालय व्यवस्था असते. अपघात, हृदयविकार किंवा अन्य कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट अत्यंत महत्त्वाचे असते. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचणे आणि त्यामध्ये सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा असणे गरजेचे आहे. या सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यातील त्रुटी व अडचणी समजून घेण्यासाठी आपण हा प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, जालना जिल्ह्यातील १०८ व १०२ रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Source: Cosmo News Desk

Related Posts