Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये थकीत वाहतूक चलनावर मिळणार २० टक्के सवलत
Nashik

नाशिकमध्ये थकीत वाहतूक चलनावर मिळणार २० टक्के सवलत

नाशिक | राज्यातील वाहनधारकांसाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतला असून, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनांवर आकारण्यात आलेल्या आणि अद्याप वसूल न झालेल्या ई-चलनांच्या दंडाच्या रकमेत २० टक्के सवलत देण्यासाठी ‘महाराष्ट्र वाहतूक पोलिस चलान अभय योजना-२०२६’ लागू करण्यात आली आहे. येत्या १ डिसेंबर २०२६ पासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. गृह विभागाने २७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या वाहतूक दंडाचा भरणा करण्यासाठी वाहनचालकांना आता विशेष सवलतीची संधी उपलब्ध होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि तीन टप्पे

राज्य मंत्रिमंडळाच्या ४ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ही योजना तीन टप्प्यांत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभय योजनेचा कालावधी संपल्यानंतर वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

योजनेच्या पहिल्या टप्प्यात २१ जानेवारी २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जारी झालेल्या आणि १ डिसेंबर रोजी वसुलीसाठी प्रलंबित असलेल्या पात्र ई-चलनांच्या एकूण थकीत तडजोड शुल्कावर २० टक्के सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी वाहनचालक किंवा मालकांना योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम शासनाच्या खात्यात जमा करावी लागणार आहे.

दुसरा आणि तिसरा टप्पा

दुसऱ्या टप्प्यात १ डिसेंबर २०२६ पासून पुढे जारी होणाऱ्या पात्र ई-चलनांवर लवकर भरणा सवलत अर्थात अर्ली बर्ड स्कीम लागू राहणार आहे. या टप्प्यातही दंडाच्या थकीत तडजोड शुल्कावर २० टक्के सवलत मिळेल. मात्र, संबंधित चलन कायदेशीररीत्या बजावल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत दंडाचा भरणा करणे आवश्यक आहे. ही सवलत १ डिसेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२७ या एक वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.

तिसऱ्या टप्प्यात न्यायालयात प्रलंबित असलेल्या चलनांचा समावेश करण्यात आला आहे. ३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत जारी झालेली आणि योजना सुरू होण्याच्या दिवशी सक्षम न्यायालयात किंवा आभासी न्यायालयात प्रलंबित असलेल्या पात्र चलनांच्या थकीत तडजोड शुल्कावर २० टक्के सवलत दिली जाणार आहे. सवलतीनंतरची रक्कम योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत भरावी लागणार आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts