Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकच्या द्वारका चौकातील 200 कोटींच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत सुनावणी पूर्ण
Nashik

नाशिकच्या द्वारका चौकातील 200 कोटींच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत सुनावणी पूर्ण

नाशिक | शहरातील द्वारका चौकातील महापालिकेच्या मालकीच्या सुमारे चार एकर जागेवरील अतिक्रमणे हटविण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात सुनावणी घेतली होती. या प्रक्रियेत कागदपत्रे सादर न केलेल्या तसेच अनुपस्थित राहिलेल्या ४० दुकानदारांची अंतिम सुनावणी गुरुवारी (दि. २६) पार पडली.

सुनावणीची प्रक्रिया आणि दुकानदारांची बाजू

अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्यासमोर संबंधित दुकानदारांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडली. द्वारका चौकातील सर्व्हे क्रमांक ४८९ मधील फायनल प्लॉट क्रमांक २८२ ही सुमारे चार एकर जागा महापालिकेच्या मालकीची असून, सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत सुमारे २०० कोटी रुपये आहे. नाशिक नगरपालिका अस्तित्वात असताना १९७३ पासून ही जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली होती आणि सध्या येथे १०९ दुकानदार व्यवसाय करत आहेत. रस्ता रुंदीकरणात अडथळा येत असल्याने २०१५ मध्ये महापालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर २०२० मध्ये ही दुकाने अनधिकृत ठरवत १५ दिवसांत रिकामी करण्याचे आदेश दिले होते, ज्याविरोधात दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयीन लढा आणि आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष

जिल्हा न्यायालयाने २०२३ मध्ये महापालिकेच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर काही दुकानदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने दुकानदारांच्या बाजूने निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेचा ताबा कायम ठेवत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नाशिक पूर्व विभागाने पहिल्या टप्प्यात ७६ दुकानदारांना नोटिसा बजावून ऑक्टोबरमध्ये सुनावणी घेतली होती. आता अंतिम सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, महापालिका आयुक्त मनीषा खत्री या प्रकरणात काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts