Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकच्या द्वारका सर्कल प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण
Nashik

नाशिकच्या द्वारका सर्कल प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण

नाशिक | शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या द्वारका सर्कल येथील इंटरचेंज प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआयडीसी) २१३.८७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम सुरू आहे. मुंबई-आग्रा महामार्ग, पुणे रोड, नाशिक रोड आणि शहरांतर्गत वाहतुकीचा मोठा भार द्वारका सर्कलवर येत असल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि सद्यस्थिती

एकूण ५६३ मीटर लांबीच्या या इंटरचेंजमध्ये पुणे रोड ते नाशिक शहरादरम्यान वाहनांसाठी १०० मीटर लांबीचा भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे. पुणे बाजूकडील रॅम्प आणि भुयारी मार्गाचे महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील ५३ मीटरचे बांधकामही पूर्ण झाले असून, सध्या काँक्रीट मजबुतीकरणासाठी क्युरिंग प्रक्रिया सुरू आहे. नाशिक बाजूकडील रॅम्प, सर्व्हिस रोड आणि विविध सुविधांच्या वाहिन्यांचे स्थलांतर सुरू आहे. जानेवारी २०२७ अखेरपर्यंत या प्रकल्पातील मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवली आले आहे. तसेच फेब्रुवारी २०२७ अखेर संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले आहे. कुंभमेळ्यापूर्वी नागरिक आणि भाविकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान मुंबई आणि धुळे बाजूकडील यू-टर्न सुविधांची कामे दुसऱ्या टप्प्यात हाती घेण्यात येणार असून, ती कुंभमेळ्यानंतर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर द्वारका परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल.

Source: Cosmo News Desk

Related Posts