Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • लासलगाव बाजारात कांदा दरात मोठी घसरण
Nashik

लासलगाव बाजारात कांदा दरात मोठी घसरण

नाशिक | कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे कांद्याचे पीक वाचवण्यासाठी टँकरने पाणी आणण्याची कसरत करावी लागत आहे, तर दुसरीकडे बाजारपेठेत कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. प्रचंड मेहनत, पैसा आणि पाण्याची जुळवाजुळव करून उभे केलेले कांद्याचे पीक आता दरामुळे चिंतेचा विषय बनले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी आणि पुरवठा यांच्यातील समतोलामुळे दरावर दबाव निर्माण झाला आहे.

लासलगाव बाजारात दरात मोठी घसरण

आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या कमाल दरात प्रतिक्विंटल सुमारे १,४१९ रुपये आणि सरासरी दरात १,१०० रुपयांची तीव्र घसरण झाली आहे. १८ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ५,७०० रुपयांचा दर मिळाला होता. मात्र, अवघ्या आठवडाभरात या दरात मोठी कपात होऊन मंगळवारी कमाल दर ४,२८१ रुपयांपर्यंत खाली घसरला.

पाण्याची टंचाई आणि निर्यातीचा फटका

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा कमी दराने उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे, ज्याचा थेट फटका देशांतर्गत बाजारभावाला बसत असल्याची माहिती कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांनी दिली. चांदवड तालुक्यातील तळेगाव रुई येथील शेतकरी अजित गाडे यांनी सात एकर लाल कांद्याची लागवड केली होती, परंतु पाण्याअभावी पाच एकरांतील पीक सोडून द्यावे लागले आणि उरलेला कांदा टँकरच्या पाण्यावर जगवला. गेल्या आठवड्यात ४,९०० रुपये मिळणारा भाव आता ३,५०० रुपयांवर आल्याने शेतीचा खर्च भागवणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले.

Source: Cosmo News Desk

Related Posts