Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • मोह येथील तौवान पिंक पेरू बागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग
Nashik

मोह येथील तौवान पिंक पेरू बागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग

नाशिक | सिन्नर तालुक्यातील मोह येथील महाराष्ट्र कृषिभूषण पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी सुनील भिसे यांच्या विठ्ठल फार्मवर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. त्यांच्या शेतातील तौवान पिंक पेरूच्या बागेला शेतकरी प्रतिनिधींनी सदिच्छा भेट दिली आणि शेतीतील विविध प्रयोगांची सविस्तर माहिती घेतली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नैसर्गिक शेतीचा ध्यास आणि सातत्याने नवीन प्रयोग केल्यामुळे शेती कशी समृद्ध होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळाले.

स्मार्ट निरीक्षण यंत्रणा आणि हवामान व्यवस्थापन

सुनील भिसे यांनी आपल्या शेतात तौवान पिंक जातीच्या पेरूची उत्कृष्ट बाग फुलवली असून बागेचे नियोजन, फळांचे संरक्षण, दर्जेदार उत्पादन आणि आधुनिक व्यवस्थापनामुळे ही बाग विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या शेतात हवामानावर आधारित स्मार्ट निरीक्षण यंत्रणा बसवण्यात आली आहे. याद्वारे हवेची दिशा, वाऱ्याचा वेग, वातावरणातील व जमिनीचे तापमान, पावसाची शक्यता तसेच पिकांना आवश्यक पाण्याची माहिती थेट मोबाईलवर उपलब्ध होते.

जवळपास दीड किलोमीटर परिसरातील हवामानातील बदलांची अचूक माहिती मिळ1त असल्याने फवारणी, पाणी व्यवस्थापन आणि बागेच्या निगेबाबत योग्य निर्णय घेणे शक्य होते. या भेटीदरम्यान विठ्ठल रुक्माई नैसर्गिक शेती शेतकरी गटाचे अध्यक्ष तथा ब्राह्मणवाडेचे पोलिसपाटील कमलाकर रामराजे, बीआरसी प्लांटधारक तथा प्रगतशील शेतकरी अशोक आनंदा वाघ आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक भिका माळी यांच्यासह अनेक शेतकरी मित्र उपस्थित होते.

बीआरसी प्लांट आणि जैविक निविष्ठांची निर्मिती

नैसर्गिक शेतीला प्राधान्य देत भिसे यांनी आपल्या शेतात स्वतःचा बीआरसी प्लांट उभारला आहे. या प्लांटमध्ये तब्बल १४ प्रकारच्या जैविक निविष्ठा आणि जैविक कीड नियंत्रक उत्पादनांची निर्मिती केली जाते. या उत्पादनांचा वापर ते स्वतःच्या फळबागेसह विविध पिकांवर करतात. रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून जैविक निविष्ठांच्या माध्यमातून शेती करण्याचा त्यांचा हा प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिशादर्शक ठरत आहे.

भेट दिलेल्या शेतकरी प्रतिनिधींनी पेरूच्या बागेची पाहणी करून झाडावरील ताज्या तौवान पिंक पेरूची चव चाखण्याचा आनंद घेतला. तसेच फळांच्या दर्जाचे व चवीचे कौतुक केले. हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च आणि कीड-रोगांच्या समस्यांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत नैसर्गिक शेतीचे प्रयोग करणे काळाची गरज असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले.

Source: Cosmo News Desk

Related Posts