Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रेड्डे येथे माने कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी
Maharashtra

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रेड्डे येथे माने कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी

पालकमंत्री जयकुमार गोरे रेड्डे येथील शेतकरी माने कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करताना

सोलापूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याच्या अनुषंगाने ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवेढा तालुक्यातील रेड्डे येथील शेतकरी माने कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन दिवाळी साजरी केली. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता करू नये, शासन ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

माने कुटुंबीयांच्या अडचणींची जाणून घेतली माहिती

पालकमंत्री गोरे यांनी माने कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची तसेच दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणींची माहिती जाणून घेतली. कुटुंबातील कर्ते पुरुष बंडू भुजा माने हे ऊसतोड कामगार म्हणून कामासाठी बाहेरगावी गेल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी गोविंद भुजा माने तसेच बंडू भुजा माने यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. दिवाळी सणानिमित्त माने कुटुंबीयांना फराळ व आहेर भेट देण्यात आली.

लहान मुलांना कपड्यांचे वाटप

घरातील लहान मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री गोरे यांनी मुलांशी संवाद साधत त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. पालकमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केल्याने माने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts