Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • पुण्यात २० नोव्हेंबर २०२६ रोजी होणार राज्यस्तरीय महाराष्ट्र बाल संसद
Maharashtra

पुण्यात २० नोव्हेंबर २०२६ रोजी होणार राज्यस्तरीय महाराष्ट्र बाल संसद

यशदा पुणे येथे भरणाऱ्या बाल संसदेत चर्चा करताना शाळकरी विद्यार्थी

मुंबई | महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र बाल संसद २०२६’ या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. बालकांचा निर्णयप्रक्रियेतील सहभाग वाढवणे, नेतृत्वगुण विकसित करणे आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करणे हा यामागचा उद्देश आहे. शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी जागतिक बाल दिनानिमित्त पुणे येथील यशदा येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, यशदा आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

बाल संसदेची रचना आणि मध्यवर्ती संकल्पना

या बाल संसदेमध्ये राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १०२ नामनिर्देशित बालस्नेही ग्रामपंचायतींमधून निवडलेले शंभराहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. इयत्ता सहावी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना यात संधी मिळणार असून प्रत्येक जिल्ह्यातून तीन विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. ‘विकसित महाराष्ट्र @२०४७’ ही या बाल संसदेची मध्यवर्ती संकल्पना असून स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत महाराष्ट्र कसा असावा, याबाबत विद्यार्थी विचार मांडतील. विधानसभेच्या कामकाजाच्या धर्तीवर या कार्यक्रमाची रचना करण्यात आली असून याद्वारे विद्यार्थी बाल मुख्यमंत्री, बाल सभापती आणि बालमंत्री निवडणार आहेत. सभागृहात ते प्रश्नोत्तराच्या सत्रात संवाद साधतील तसेच शून्य प्रहराच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यांमधील समस्या मांडतील.

विभागीय समित्या आणि बालकांची सनद

या उपक्रमात सहा विभागीय समित्यांमार्फत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. यात पुणे विभागात शिक्षण, छत्रपती संभाजीनगर विभागात दुष्काळ, कोकण विभागात उद्योग व रोजगार, नाशिक विभागात बाल हक्क, नागपूर विभागात समाजमाध्यमे व डिजिटल पायाभूत सुविधा आणि अमरावती विभागात पोषण या विषयांवर विचार मांडले जातील. या बाल संसदेची महत्त्वाची निष्पत्ती म्हणून बालकांचे मुद्दे, समस्या आणि शिफारशी समाविष्ट असलेली ‘बालकांची सनद’ तयार केली जाणार आहे. ही सनद मुख्यमंत्री तसेच संबंधित राज्य शासनाच्या विभागांना सादर करण्यात येणार असून याद्वारे बालकांच्या विचारांचा विकास प्रक्रियेत समावेश केला जाणार आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts