Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • येवला तालुक्यात दुष्काळामुळे पेरूच्या बागा वाळून खाक
Nashik

येवला तालुक्यात दुष्काळामुळे पेरूच्या बागा वाळून खाक

नाशिक | निसर्गाच्या लहरीपणाचा आणि दुष्काळजन्य परिस्थितीचा मोठा फटका आता नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. पावसाअभावी आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या बागा अक्षरशः वाळून गेल्या आहेत.

ममदापूरच्या शेतकऱ्याची बाग उद्ध्वस्त

ममदापूरच्या दादासाहेब वाघ यांनी गेल्या ३ वर्षांपासून मोठ्या कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने पेरूच्या बागा उभ्या केल्या होत्या. मात्र पावसाअभावी हिरव्यागार झाडांनी बहरलेल्या बागा आज उजाड झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. यंदा येवला तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांसह फळबागांनाही मोठा फटका बसला आहे.

पाण्याच्या टंचाईमुळे टँकरही मिळेना

पेरूच्या बागा जगविण्याकरिता या शेतकऱ्याने शंभर टँकर पाण्याचे बुक केले होते. मात्र, पंधरा टँकर मिळाल्याने त्यावर बाग जागवता आली नाही. पाणीच नसल्याने टँकर देखील मिळत नसल्याने अक्षरशः पूर्णपणे बाग वाळत चालली आहे. फळबाग उभी करण्यासाठी अनेक वर्षे लागतात; मात्र ती वाळून जाण्यासाठी पाण्याची टंचाई पुरेशी ठरत आहे. यामुळे पेरू उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून शासनाकडून मदत आणि नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts