Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिक महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा आज अंतिम टप्पा
Nashik

नाशिक महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा आज अंतिम टप्पा

नाशिक | महापालिकेतील १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा अखेरचा टप्पा शुक्रवारी (दि. २०) पार पडणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या अध्यक्षतेखाली ही महासभा होणार असून, प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या १० नावांच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ही स्वीकृत नगरसेवकांची १० जागांची नियुक्ती प्रक्रिया गेल्या नऊ महिन्यांपासून रखडली होती. मात्र आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्रशासनाने नियमानुसार संबंधित गटनेत्यांनी सुचवलेल्या १० सदस्यांचीच नावे नियुक्तीसाठी सादर केली आहेत. यामध्ये भाजपचे अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, चंद्रशेखर पंचाक्षरी, रामहरी संभेराव, शिवसेना शिंदे गटाचे सूर्यकांत लवटे, बाबूराव आढाव आणि उबाठाचे हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड यांचा समावेश आहे.

कायदेशीर पेच आणि राजकीय घडामोडी

भाजपमधील एका गटाने काँग्रेसच्या नाराज नगरसेवकांना हाताशी धरत सातव्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी आग्रह कायम ठेवल्याने नियुक्तीचा पेच निर्माण झाला आहे. उबाठाने मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. उबाठाचे गटनेते केशव पोरजे, ‘स्वीकृत’चे उमेदवार हेमंतकुमार गायकवाड आणि बाबासाहेब गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. उबाठाच्या वतीने अॅड. विनोद महाडिक यांनी काँग्रेसचे नगरसेवक सुफियान जीन आणि भाजपचे सुनील आडके यांनाही नोटीस बजावल्याने या नियुक्ती प्रक्रियेला कायदेशीर वळण मिळाले आहे. प्रशासनाने नियमांचा आधार घेत या मागणीला नकार दिल्याने आता संपूर्ण मदार महापौरांच्या निर्णयावर आहे.

महापौरांच्या भूमिकेकडे संपूर्ण शहराचे लक्ष

काँग्रेसच्या तीन नगरसेवकांच्या कथित पाठिंब्याच्या आधारे उबाठाच्या एका उमेदवाराचे नाव वगळून भाजपचे सुनील आडके यांना सातव्या जागेवर संधी द्यावी, यासाठी भाजपमधील एका गटाकडून दबाव आणला जात आहे. मात्र प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावात बदल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या प्रस्तावाविरोधात निर्णय घेतल्यास स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा वाद पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याची दाट शक्यता आहे. उबाठाने आधीच कॅव्हेट दाखल केल्यामुळे न्यायालयीन हस्तक्षेपाची शक्यता बळावली आहे. सातव्या सदस्याच्या नियुक्तीचा कायदेशीर पेच लक्षात घेता सध्या भाजप बॅकफूटवर असल्याचे चित्र निर्माण झाले असून, महापौर या राजकीय आणि कायदेशीर पेचातून कसा मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts