Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकच्या रामकुंडावर ऑइल पेंटचे निशाण हटवले
Nashik

नाशिकच्या रामकुंडावर ऑइल पेंटचे निशाण हटवले

नाशिक | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोटीवधी रुपये खर्च करून गोदाघाट आणि रामकुंड परिसराचे सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. छटपूजेच्या निमित्ताने काही उत्तर भारतीय लोकांकडून घाटाच्या पायांवर आणि चौथ्यांवर ऑइल पेंटने (तैलरंगाने) नावे लिहून तसेच मोठी फुली आणि गोलाकार चिन्हे काढून जागा आरक्षित करण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकारामुळे नव्याने विकसित केलेल्या घाटाचे सौंदर्य बिघडले होते आणि परिसराचे विद्रूपकरण झाल्याचा आक्षेप गोदाप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी घेतला होता.

मनसेचा आक्रमक पवित्रा आणि इशारा

या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवला. आगामी कुंभमेळ्यासाठी सुशोभिकरणाची कामे सुरू असताना अशी कृती खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका मनसेने मांडली. घाटावरील तैलरंग तातडीने हटवून परिसर पूर्ववत स्वच्छ करावा, अशी मागणी करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारे घाटाचे विद्रूपकरण केल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

प्रशासन आणि मनसेची भूमिका

मनसेच्या या भूमिकेनंतर संबंधित यंत्रणेने ऑइल पेंटने आखणी केलेल्या जागांची तात्काळ स्वच्छता केली. संबंधितांना सार्वजनिक परिसराची स्वच्छता आणि जतन करण्याबाबत समज देण्यात आली. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी सांगितले की, रामकुंड आणि गोदाघाट हा संपूर्ण देशाच्या श्रद्धेचा विषय आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून कोणीही जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न करू नये. याप्रसंगी मिलिंद कांबळे, विजय ठाकरे, किरण क्षीरसागर, अमित गांगुडे, योगेश घोडे, अर्जुन वेताळ, संदीप दोंदे, कैलाश मोरे, तुषार जगताप, ललित वाघ, प्रफुल्ल बेनमेरू यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts