Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिक व दिंडोरी तालुके दुष्काळ मदतीपासून वंचित, अद्याप निर्णयाची प्रतीक्षा
Nashik

नाशिक व दिंडोरी तालुके दुष्काळ मदतीपासून वंचित, अद्याप निर्णयाची प्रतीक्षा

नाशिक | जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने शेती आणि शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा दुष्काळी परिस्थितीच्या निकषांनुसार समावेश करून त्यांना मदतीचा लाभ देण्यात आला असताना, नाशिक आणि दिंडोरी या दोन तालुक्यांबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून त्यांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

पावसाची तूट आणि पिकांचे नुकसान

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ९१५.४ मिमी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष ६५२.२ मिमी पाऊस झाला, जो सरासरीच्या केवळ ७१.२ टक्के आहे. नाशिक तालुक्यात सप्टेंबरमध्ये १३३.२ मिमीच्या तुलनेत ४३.५ मिमी आणि दिंडोरीत १३३.३ मिमीच्या तुलनेत ७०.९ मिमी पाऊस झाला. पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली, उत्पादनात घट झाली व काही भागांत पिके वाळून गेली. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. या दोन्ही तालुक्यांतील शेतीचे नुकसान लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेरसर्वेक्षण करून सुधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

प्रशासनाचा अहवाल आणि मदतीची प्रतीक्षा

उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने फेरसर्वेक्षण पूर्ण करून सुधारित अहवाल शासनाकडे पाठवला आहे. शासनाने घोषित केलेल्या १३ तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे १२ नोव्हेंबरअखेर ४ लाख ४७ हजार ०४३ शेतकऱ्यांच्या खात्यांत २२३ कोटी ५२ लाख १५ हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यात आली आहे. तसेच दुष्काळी तालुक्यांसाठी जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, वीजबिलात सवलत यांसारख्या १२ सवलती लागू करण्यात आल्या आहेत. मात्र नाशिक आणि दिंडोरीचा या यादीत समावेश नसल्याने येथील शेतकरी लाभापासून वंचित असून शासन यावर काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts