Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • पुसद तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला गती
Maharashtra

पुसद तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला गती

पुसद तालुक्यातील शेत पाणंद रस्त्याचे काम दर्शवणारे चित्र

यवतमाळ | पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यांसारख्या शेतीच्या कामांसाठी तसेच शेतमजूर आणि जनावरांच्या वाहतुकीसाठी बारमाही पक्के शेतरस्ते मिळावेत, यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या अंमलबजावणीला गती देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत तालुक्यातील सुमारे १,२११ किलोमीटर लांबीचे ८७६ कच्चे रस्ते पक्के करण्याचे नियोजन करण्यात आले असून, यामुळे अंदाजे १० हजार शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. हे पक्के रस्ते निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे सोपे होईल आणि शेतीमाल बाजारात पोहोचविण्यास मोठी मदत होईल.

समितीची स्थापना आणि सीएसआर निधीचा वापर

महसूल व वन विभागाच्या १४ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ‘पुसद विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. राज्याचे राज्यमंत्री तथा समितीचे अध्यक्ष इंद्रनिल नाईक यांच्या अध्यक्षतेखाली २४ जानेवारी आणि २७ एप्रिल २०२६ रोजी बैठका पार पडल्या. तसेच ६ जुलै, १७ जुलै आणि ४ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन आढावा घेण्यात आला. शासन निर्णयातील तरतुदीनुसार उपविभागीय अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव यांच्या नावे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या पुसद शाखेत स्वतंत्र सीएसआर खाते उघडण्यात आले आहे. कंपन्यांच्या डिलर्सची बैठक घेऊन निधी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले असून, प्राप्त सीएसआर निधीतून मौजा हर्षी येथील आश्रमशाळा ते रेल्वे मार्ग आणि ज्योतीनगर येथील गावठाण ते स्मशानभूमी या दोन रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

अंदाजपत्रक आणि कार्यारंभ आदेश

योजनेअंतर्गत संमतीपत्र मिळालेल्या एकूण ३८ रस्त्यांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, पुसद यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. यातील १० पाणंद रस्त्यांचे अंदाजपत्रक तयार होऊन त्यांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी ८ कामांचे कार्यारंभ आदेश जारी करण्यात आले आहेत. उर्वरित रस्त्यांचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांना देण्यात आले आहेत. तसेच प्रस्तावित रस्त्यांचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींच्या ठरावांसह तत्काळ सादर करण्याचे आदेश पुसदचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी दिली.

Source: Cosmo News Desk

Related Posts