Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये सिंहस्थ स्वागतासाठी १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ‘नाशिक महोत्सव २०२६’
Nashik

नाशिकमध्ये सिंहस्थ स्वागतासाठी १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ‘नाशिक महोत्सव २०२६’

नाशिक | आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी जुने नाशिक प्रतिष्ठानच्या वतीने १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ‘नाशिक महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, संगीत, संस्कृती आणि सामाजिक कृतज्ञतेचा संगम असलेल्या या महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम १४ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता गौरी पटांगण, गंगाघाट येथे पार पडणार आहे. या महोत्सवामध्ये प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्यासह नाशिकचे कलाकार भक्तिमय संगीताची मेजवानी रसिकांसमोर सादर करणार आहेत.

गायतन स्पर्धा आणि मुख्य आकर्षण

महोत्सवाच्या निमित्ताने १२ व १३ नोव्हेंबरला यशवंत महाराज पटांगण, रामकुंड येथे गायन स्पर्धेच्या ऑडिशन्स आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेतून निवडलेल्या तीन उत्कृष्ट गायकांना थेट अवधूत गुप्ते यांच्या व्यासपीठावर हजारो प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन वावरे, आदित्य पाटेकर, सोनाली सोनवणे आणि कस्तुरी साईराम हे कलाकार सहभागी होणार आहेत. पारंपरिक अभंग-भजन आणि आधुनिक संगीताचा अनोखा संगम असलेला ‘भजन क्लबिंग’ हा या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

मान्यवरांचा सन्मान आणि महोत्सवाचा उद्देश

या महोत्सवादरम्यान ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक गजानन (नाना) शेलार यांना ‘लोकनेते पुरस्कार’, तर आयएएस अधिकारी स्वप्निल पवार यांना ‘जुने नाशिक गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे. तसेच, अधिकारी स्वप्निल पवार यांच्या आई-वडिलांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, कुंभमेळा आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्तांसह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान केला जाईल. जुन्या नाशिकचा ऐतिहासिक वारसा, पुनर्विकास, नागरी सुविधा आणि मूलभूत प्रश्न शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदन भास्करे यांनी दिली आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts