Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • उमेद अभियानाचा ‘ताजा दिवाळी फराळ’ बनवण्याचा अभिनव उपक्रम सुरू
Maharashtra

उमेद अभियानाचा ‘ताजा दिवाळी फराळ’ बनवण्याचा अभिनव उपक्रम सुरू

नवी मुंबईत सुरू झालेल्या उमेद अभियानाच्या दिवाळी फराळ महोत्सवाचे दृश्य

मुंबई | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे (उमेद अभियान) आयोजित विशेष ‘दिवाळी फराळ महोत्सवाचा शुभारंभ’ अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे-पाटील यांच्या हस्ते नवी मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमाला अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय उपसंचालक बाळासाहेब टट्टू, श्वेता पालवे, संदीप जठार आणि तंत्र अधिकारी तथा अवर सचिव शरद गीते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी या सोहळ्यास उपस्थित होते.

ग्राहकांच्या नजरेसमोर तयार होतोय ताजा फराळ

स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि ग्राहकांना उच्च दर्जाचा फराळ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानाने ग्राहकांच्या समोर प्रत्यक्ष दिवाळी फराळ तयार करण्याची अभिनव संकल्पना यावर्षी राबवली आहे. या उपक्रमामुळे फराळाची स्वच्छता, दर्जा आणि ताजेपणाबाबत ग्राहकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महोत्सवाचे आणखी एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे फराळ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळत असून ग्राहकांना शुद्ध आणि कसदार पदार्थांचा आस्वाद घेता येत आहे.

पारंपरिक चवीचे विविध फराळ उपलब्ध

या विशेष महोत्सवात महिला बचतगटांनी तयार केलेले अनेक स्वादिष्ट आणि पारंपरिक पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात ताजी शेव, खुसखुशीत अनारसे, वेगवेगळ्या प्रकारच्या स्वादिष्ट करंज्या, चविष्ट चिवड्यांचे विविध प्रकार तसेच अस्सल देशी तुपात तयार केलेले बेसन व रव्याचे लाडू यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या या पारंपरिक पदार्थांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts