Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • गडचिरोलीत पाणीटंचाई निवारण आणि आरोग्यसेवेच्या कामांना गती द्या
Maharashtra

गडचिरोलीत पाणीटंचाई निवारण आणि आरोग्यसेवेच्या कामांना गती द्या

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणारे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व अधिकारी

गडचिरोली | संभाव्य पाणीटंचाईच्या निवारणासाठी गावनिहाय नियोजन करावे आणि शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी साधनसंपत्तीचा उपयोग करावा, असे निर्देश राज्याचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आठ तासांच्या मॅरेथॉन आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस खासदार नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आरोग्यसेवा आणि वनसंवर्धन

औषध खरेदीतील अनियमितता प्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करावी आणि नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश सहपालकमंत्र्यांनी दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामाचा दर्जा आणि देखभालीवर भर देण्यास सांगण्यात आले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामातील वन्यजीव मंजुरीच्या अडचणी तातडीने दूर कराव्यात. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ड्रोन, थर्मल कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसेच जंगलातील नैसर्गिक जलस्रोत बळकट करावेत, असे त्यांनी नमूद केले.

पाणीटंचाई आणि कृषी विकास

प्रत्येक ग्रामपंचायतीकडे पाच हजार लिटर क्षमतेचा स्वतंत्र टँकर उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. जलसंधारणासाठी ताडपत्री बंधारे आणि तलाव खोलीकरणाच्या कामांना गती द्यावी. रब्बी हंगामातील लागवडीविना राहणाऱ्या क्षेत्राची स्वतंत्र नोंद घेऊन चारा उत्पादन वाढविण्यासाठी तालुकानिहाय चारा बँका उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. धान खरेदी, साठवणूक आणि वेळेत भरडाई करण्यासोबतच जिल्ह्यातातील तांदळाची निर्यात पाच पटीने वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनांची दखल घेऊन कामे तातडीने सुरू करावीत.

Source: Cosmo News Desk

Related Posts