Email : 3
नाशिकमध्ये गुंडगिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हफ्ता देण्यास नकार दिल्याने काही अज्ञातांनी थेट लष्कराचे महत्त्वाचे साहित्य वाहून नेणारा एक ट्रक पेटवून दिला. या आगीत लष्कराचे सुमारे दीड कोटी रुपयांचे अत्यंत मौल्यवान आणि संवेदनशील साहित्य जळून खाक झाले आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप होत असून, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे.






